Welcome Back !To keep connected with uslogin with your personal info
Login
Sign-up
Login
Create Account
Submit
Enter OTP
Step 2
Prev
Home Nonfiction Biographies & Memoirs Henry David Thoreau Charitra Va Nibandh
Enjoying reading this book?
Henry David Thoreau Charitra Va Nibandh
by Henry David Thoreau
4.3
4.3 out of 5
Creators
AuthorHenry David Thoreau
PublisherMadhushree Publication
TranslatorJayant Kulkarni
Synopsisमेमेंटो मोरी... ...मृत्यू अटळ आहे. मला तर वाटते अमेरिकेत अजूनतरी एकही माणूस मृत्यू पावलेला नाही कारण मृत्यूसाठी अगोदर जगावे लागते. माझा शववाहिकांवर, कफनांवर आणि अंत्यविधींवर विश्वास बसणे कठीण आहे कारण ही माणसे खऱ्या अर्थाने जगलीच नाहीत. ही माणसे शेणाच्या खतासारखी या जगात हळूहळू कुजत गेली आहेत. यांच्या थडग्यासाठी मानाची जागाही नाही... कुठेतरी खड्डा खणलाय बस्स..! मी बऱ्याच जणांना ते मरणार आहेत असे ढोंग करताना पाहतो; किंवा ते मेले आहेत असेही ऐकतो. शक्यच नाही! मी त्यांना आव्हान देतो, त्यांनी मरून दाखवावे. मरायला ते जिवंतच नाहीत, तर मरणार कुठून? मी सांगतो हे असेच कुजत राहतील आणि आपल्याला त्यांच्या जागा साफ करण्याचे काम लावून जातील. माझ्या दृष्टीने जगाच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत फक्त सहा-सात लोक मेले असतील. ‘मेमेंटो मोरी’ म्हणजे ‘प्रत्येकाला मेलेच पाहिजे’ या अत्यंत महत्त्वाच्या वाक्याचा खरा अर्थ आपल्याला अजून कळलेलाच नाही... महात्मा गांधी आणि थोरो ...महात्मा गांधींनी जेव्हा अमेरिकन जनतेला उद्देशून लेख लिहिला, त्यात ते म्हणाले, “माझ्या अमेरिकन मित्रांनो! अमेरिकेने मला थोरोंच्या रुपाने एक गुरू दिला आहे. मी जो लढा उभारला आहे त्याचे ठाम व वैचारिक पुष्टिकरण मला थोरो यांच्या “ड्युटी ऑफ सिव्हिल डिसओबिडिअन्स” या निबंधात मिळाले आणि मी दक्षिण आफ्रिकेत जे काही करत होते ते काही चुकीचे नव्हते याचा हा मोठा पुरावा आहे.”... प्रेम... ...मला तर असे वाटते की, तिला काहीही न सांगता सगळे समजले पाहिजे. मी माझ्या प्रेयसीपासून दूर झालो कारण मला तिला एक गोष्ट सांगावी लागली होती. त्यावर तिने मला प्रश्न विचारले. खरे तर तिला ते समजायला हवे होते.